नमाजपठणासाठी शाहजहानी ईदगाह मैदान सज्ज, वजूसाठी २१ नळ

शाहजहानी ईदगाह मैदान pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदच्या दिवशी विशेष नमाजपठणासाठी शहरातील ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदान सज्ज झाले आहे. शहर, परिसरातील हजारो मुस्लीम बांधव याठिकाणी नमाज अदा करत असतात. या पार्श्वभूमीवर मनपातर्फे मैदानाची साफसफाई व सपाटीकरण करण्यात आले असून, वजूसाठी खास पाणी व्यवस्था केलेली आहे.

ईदगाह मैदानात तात्पुरते २१ नळ सोबत सुमारे १२ हजार लिटर पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्र्यंबक रोडवरील प्रवेशद्वाराकडे १० नळ, तर शासकीय विश्रामगृहकडील प्रवेशद्वाराच्या बाजूने ११ नळांची व्यवस्था केली आहे. नाशिक सुन्नी सीरत कमिटीने ईदगाह मैदानातील मशिदीला रंगरंगोटी देखील करण्यात आली. तसेच ईदच्या दिवशी गुरुवार (दि.११) नमाजसाठी जमलेल्या मुस्लीम बांधवांपर्यंत खुतबा वाचन, फातेहा, सलातो सलाम व नमाजनंतर होणाऱ्या विशेष प्रार्थनेचा आवाज पोहोचविण्यासाठी तात्पुरती ध्वनी प्रणालीची व्यवस्था केल्याची माहिती कमिटीचे सय्यद मीर शौकत अली यांनी दिली आहे.

ईद pudhari.news
जुने नाशिक : नळपाणी व्यवस्थेसाठी टँकरद्वारे टाकीत पाणी भरताना मनपा कर्मचारी.
ईद pudhari.news
नाशिक : रमजान ईदनिमित्त जुन्या नाशकातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बडी दर्गा शरीफवर करण्यात आलेली आर्कषक विद्युत रोषणाई.

हेही वाचा:

The post नमाजपठणासाठी शाहजहानी ईदगाह मैदान सज्ज, वजूसाठी २१ नळ appeared first on पुढारी.