नातवाला भेटण्यासाठी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुनेकडुन खंडणीची धमकी

खंडणी धमकी pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा
नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटचा ताबा हवा असेल तर जॅग्वार गाडी, फ्लॅट व 10 कोटी रुपयांची खंडणी चक्क सूनेने निवृत्त पोलिस अधिकाऱ्याकडे मागितली आहे. दागिण्याचा अपहार केला म्हणुन सेवानिवृत्त पोलिस अधिकारी यांनी सुन व तिच्या प्रियकराविरोधात अंबड पोलिस ठाण्यात दाखल केलेला असून आता खंडणीचाही गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, साहेबराव पाटील (वय ६५) हे पोलिस उपायुक्त पदावरुन निवृत्त झाले असून सध्या कर्मयोगीनगरात राहतात. त्यांनी अंबड पोलिस ठाणे येथे दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सुन स्नेहा रोशन पाटील व तिचा प्रियकर अंजिक्य पाटील (नेरूळ, मुंबई) यांनी संगनमत करुन माझे व माझ्या कुटुंबियांचे मानसिक खच्चीकरण चालवलेले आहे. समाजात आपली बदनामीचा सतत प्रयत्न चालविला आहे. स्नेहा हिचा दुष्ट हेतू असून आमचे आर्थिक नुकसान करण्याच्या इरादयाने ती आपणास तसेच पत्नी शोभा आणि मुलगा रोशन यांना सतत धमक्या देत असते. तिने माझ्या पत्नीला धक्काबुक्की तसेच शिवीगाळ व दमदाटी केलेली आहे. नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटचा ताबा घ्यायचा असेल तर जॅग्वार कार, फ्लॅटस व 10 कोटी रुपयांची खंडणी आपणाकडे मागितली असल्याचे त्यात नमूद करण्यात आलेले आहे. दागिण्याचा स्नेहाने अपहार केला असून त्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी सुन स्नेहा रोशन पाटील व तिचा प्रियकर अजिक्य पाटील यांच्याविरुध्द खंडणीप्रकरणी विविध गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.

हेही वाचा: