
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरण सध्या ७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे आता पाणीकपातीचे संकट टळले आहे. मागील वर्षी जुलैअखेर गंगापूर धरणात ७३ टक्के इतका जलसाठा होता, तर यंदा ७५ टक्के इतका साठा झाला आहे. धरणात पाणी आवक वाढत असल्याने धरणातून हंगामातील पहिला विसर्गदेखील करण्यात आला आहे.
मात्र शहरात पाहिजे तसा पाऊस अद्याप झाला नाही. गंगापूर धरण समूहातील अन्य धरणांमधील पाण्याची पातळी मात्र अजूनही अपुरी असल्याने ही धरणे भरण्याची प्रतीक्षा आहे. समूहातील काश्यपीमध्ये ४०, गौतमी गोदावरीत ४१, तर आळंदी धरणात केवळ ३४ टक्के इतकाच पाणीसाठा जमा होऊ शकला आहे. समूहातील एकूण टक्केवारी ५८ टक्के असून, मागील वर्षी समूहातील टक्केवारी जुलैअखेर ८१ इतकी होती.
पाणीसाठ्यात सातत्याने वाढ
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा साठा नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली असताना गंगापूर धरणात पाणी आवक झाल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्यस्थितीत ४१४२ दलघफू म्हणजेच ७४ टक्के पाणीसाठा आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नियंत्रित साठ्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येत आहे.
हेही वाचा :
- नाशिक क्राईम : बंदुकीचा धाक दाखवून 97 हजार लुटले
- डांबरात चिकटली कुत्री; अग्निशमन जवानांनी केली प्रयत्नाची शर्थ
- Jaipur-Mumbai Train Firing | जयपूर- मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबारानंतर RPF कॉन्स्टेबलने धावत्या रेल्वेतून उडी मारली, पण अखेर अटक
The post नाशिककरांनो पाणीकपातीचे संकट टळले, गंगापूर धरण 'इतकं' भरलं... appeared first on पुढारी.