नाशिकच्या बालाजी कोट परिसरात एकाचा खून

Murder Case

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गाेदाघाटावरील बालाजी काेट परिसराजवळ सुवर्णकार संस्थेनजिक माेकळ्या जागेत मद्यपिंनी एकाच्या डोक्यात दगड मारत खून केला. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

सनी जाॅन मायकल (३५, रा. बाेधलेनगर, उपनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात पाच जण मद्यसेवन करत होते. त्यांच्यात वाद झाल्याने हाणामारी झाली. संशयितांनी मायकलच्या डोक्यात दगड मारला. त्यातच मायकलचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पाेलिस तपास करत आहेत. मृत सनी हा मनपा कर्मचारी असल्याचे समजते.

हेही वाचा –