नाशिकमधील पंतप्रधान मोदींच्या सभेचा ठरला मुहूर्त, महायुतीकडून जय्यत तयारी

पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (दि. १५) सभा घेणार आहे. पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटच्या मैदानावर दुपारी अडीच वाजता ही सभा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी भाषणातून कोणावर वाग्बाण सोडतात याकडे अवघ्या जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Election 2024)

राज्यात लोकसभा निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या तीन टप्यातील मतदान पार पडल्यानंतर उर्वरित चौथ्या व पाचव्या टप्यातील जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभेच्या धामधूमीत येत्या २० तारखेला नाशिक व दिंडोरीत मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. निवडणूकीत महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह महायुतीचे उत्तर महाराष्ट्रातील मंत्री व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

पंतप्रधान मोदी यांच्यासभेकरीता यापूर्वी १० तारखेचा मुहूर्त काढण्यात आला होता. परंतु, शुक्रवारी (दि. १०) अक्षय्य तृतीया असल्याने प्रचारसभेला गर्दी कमी होईल, अशी भिती युतीमधील तीन्ही पक्षांना लागून होती. त्यामुळे सभेची तारिख बदलावी, अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठ पातळीवर करण्यात आली होती. त्यानूसार आता १५ तारखेला सभा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत असून महायुतीमधील तीन्ही मित्रपक्ष कामाला लागले आहेत. (Lok Sabha Election 2024)

उद्धव ठाकरेंची सभा

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी (दि. १५) नाशिकमध्ये सभा पार पडणार आहे. या सभेकरीता प्रशासनाने परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळी ६ ते १० यावेळेत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे सभा पार पडणार आहे. तर १७ मे रोजी सायंकाळी सहा ते दहा यावेळेत नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची रॅली पार पडणार आहे.

हेही वाचा –