नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व महाआघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी खर्चात आघाडी घेतली आहे. दिंडोरीत युतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी पावणेदहा लाखांचे खर्च केल्याचे प्रशासनाच्या लेखी आहे.
नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील खर्चाची तपासणी गुरुवारी (दि.९) पार पडली. आयाेगाने नियुक्त केलेल्या खर्च निरीक्षकांपुढे गोडसे यांनी सहा दिवसातील खर्चाचे सादरीकरण केले. त्यामध्ये ३७ लाख ४८ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे दाखवले. पण खर्च निरीक्षकांनी नोंदविलेल्या निरीक्षणानूसार ३९ लाख ५९ हजारांवर खर्च झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात दोन लाख दहा हजारांची तूट दिसून येते. आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी आठ लाख ७७ हजार रुपये खर्च झाल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात नऊ लाख ६० हजारांवर खर्च झाल्याचे प्रशासनाने नोंदवले आहे. त्यांच्या खर्चातही ८२ हजारांची तूट दिसून येते.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार डॉ. पवार यांनी सहा लाख दोन हजार रुपये खर्च सहा दिवसांत केल्याचे नमूद केले. परंतू, प्रशासनाच्या पाहाणीत ९ लाख ७४ हजारांवर खर्च केल्याचे नमूद केले असून त्यांच्या खर्चात ३ लाख ७१ हजार ६२४ रुपयांची तफावत आढळली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंनी पाच लाख १० हजार २९६ खर्चाचे सादरीकरण केल्याचे निरीक्षण प्रशासनाने केले आहे. त्यापैकी पाच लाख ३४ हजार ७७१ रुपयांचा खर्च त्यांनी सादर केला. उर्वरित साडेसहा हजारांची तफावत दिसून येते. या दोन्ही उमेदवारांना खर्च फेरसादर करण्याची नोटीस खर्च निरीक्षकांनी नोंदवली आहे.
उमेदवारनिहाय खर्च
हेमंत गोडसे :
३९ लाख ५९ हजार ६९३ (प्रशासनाने नोंदवलेला)
३७ लाख ४८ हजार ७७० (उमेदवाराने दाखवलेला)
दोन लाख १० हजार ९२३ (तफावत)
…..
राजाभाऊ वाजे :
९ लाख ६० हजार २८५रु. (प्रशासनाने नोंदवलेला)
८ लाख ७७ हजार ६५९रु. (उमेदवाराने दाखवलेला)
८२ हजार ६२६ (तफावत)
….
शांतिगिरी महाराज :
८ लाख २९ हजार ६०९रु. (प्रशासनाने नोंदवलेला)
५ लाख ९ हजार १३८रु. (उमेदवाराने दाखवलेला)
तीन लाख २० हजार ४७१ (तफावत)
…
करण गायकर :
एक लाख ९७ हजार ३३०रु. (प्रशासनाने नोंदवलेला)
एक लाख ९६ हजार ९००रु. (उमेदवाराने दाखवलेला)
चारशे रुपये (तफावत)
…
डॉ. भारती पवार :
९ लाख ७४ हजार २५० रु.(प्रशासनाने नोंदवलेला)
६ लाख २ हजार ६२६रु. (उमेदवाराने दाखवलेला)
३ लाख ७१ हजार ६२४ रु. (तफावत)
…
भास्कर भगरे
५ लाख १० हजार २९६ रु.(प्रशासनाने नोंदवलेला)
५ लाख ३४ हजार ७७७ रु.(उमेदवाराने दाखवलेला)
सहा हजार ४८० रु.(तफावत)
हेही वाचा –