नाशिकमध्ये दिवसा कडक ऊन, रात्री गारवा

तापमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत आहेत. दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा जाणवत आहे. या बदलत्या हवामानामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम नाशिकच्या हवामानावर होत असून, सातत्याने बदल होत आहे. नाशिकमध्ये गुरुवारी (दि.९) किमान तापमान ११.५ अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले असले तरी कमाल तापमानाचा पारा ३४.७ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाखा बसत आहे. सर्वसामान्य नागरिक पाच मिनिटेदेखील उन्हात उभे राहू शकत नाही. तर रात्री शीतवाऱ्यांचा वेग अधिक असल्याने थंडी जाणवते आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांना ताप, सर्दी-पडसे अशा विविध आजारांना सामोरे जावे लागते आहे.

जिल्ह्याच्या अन्य भागातही ऊन-थंडीचा खेळ सुरू असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, वातावरणातील हा बदल पुढील काही दिवस कायम राहील असा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये दिवसा कडक ऊन, रात्री गारवा appeared first on पुढारी.