नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेना शिंदे गट आणि भाजप पाठोपाठ मनसेनेदेखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करत निषेध नोंदविला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांची प्रतिमाही पायदळी तुडवली.
मनुस्मृतीचे दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टरही अनावधानाने फाडले गेल्याने आमदार आव्हाड यांनी आंबेडकरी जनतेची माफी मागितली आहे. मात्र, आव्हाड यांच्याविरोधात सत्तारूढ भाजप, शिवसेना शिंदे गट आक्रमक झाले असून, बुधवारी (दि.२९) नाशिकमध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेने आव्हाड यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन करत निषेध नोंदविला. त्यानंतर गुरुवारी भाजपनेही आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर मनसेनेदेखील ‘राजगड’ कार्यालयासमोर आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, बंटी लभडे, धीरज भोसले, साहेबराव खर्जुल, नितीन माळी, भाऊसाहेब निमसे, अमित गांगुर्डे, राकेश परदेसी, प्रफुल बनबैरू, ललित वाघ, मेघराज नवले, किशोर वडजे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा-