नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट, 2 जण जखमी

सिलेंडर स्फोट www.pudhari.news

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; नाशिकच्या इंदिरानगर परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन जण गंभीर भाजले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.

इंदिरानगर परिसरातील एका पार्सल पॉइंटच्या दुकानात हा स्फोट झाला. सिलेंडरची जोडणी केली जात असताना स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलिसांचे श्वान पथक याठिकाणी दाखल झाले आहे. स्फोट झाल्याबरोबर याठिकाणी मोठी आग भडकली होती. त्यामुळे आजुबाजुचे नागरिक भयभीत झाले.

स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, दुकानाच्या आतील सर्व सामान काउंटरसह बाहेर रस्त्यावर पडलं. जखमी जवळपास 50 ते 60 टक्के भाजल्याची माहिती आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट, 2 जण जखमी appeared first on पुढारी.