
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकहून सध्या स्पाइस जेट कंपनीची दिल्ली आणि हैदराबाद विमानसेवा सुरू असून, येत्या १५ मार्चपासून इंडिगो कंपनीसुद्धा विविध शहरांमध्ये आपल्या सेवा सुरू करीत आहे. त्यामध्ये नाशिक-गोवा, नाशिक-नागपूर, नाशिक-अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. सध्या या शहरांसाठी तिकीट बुकिंग सुरू असून, त्यास नाशिककरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या शहरांसाठी तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांवर एक हजार रुपयांची सूट मिळणार आहे.
नाशिकहून विविध शहरांमध्ये विमानसेवा सुरू झाली तेव्हापासूनच नाशिक-गोवा ही विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीने ही सेवा सुरू केली असून, त्याच्या तिकीट बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याव्यतिरिक्त नाशिक-नागपूर, नाशिक-अहमदाबाद या शहरांसाठीदेखील सेवा सुरू होत आहे. दरम्यान, या शहरांसाठी असलेल्या तिकिटाच्या रकमेवर एक हजार रुपयांची प्रवाशांना सूट मिळविता येणार आहे. एका ऑनलाइन कंपनीकडून फ्लाइट तिकिटाचे बुकिंग करून गोवा, पुणे आणि दिल्ली विमानतळावर लॅण्ड होणाऱ्या ग्राहकांसाठी व्हाउचर्स उपलब्ध करून दिले आहेत. हे व्हाउचर्स वापरून ग्राहकांना तिकिटावर एक हजार रुपयांची सूट मिळविता येणार आहे. विमानसेवेला प्रतिसाद मिळावा म्हणून या कंपनीची युक्ती प्रवाशांसाठी कितपत फायदेशीर ठरेल, याबाबतची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :
- नाशिक : इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
- चंद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक जखमी
- महाराष्ट्रातील चार खासदारांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड
The post नाशिकहून गोवा, दिल्ली तिकिटावर 'इतक्या' रुपयांची सूट appeared first on पुढारी.