नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू

गंगापूर धरणात बुडून मृत्यू,www.pudhari.news

नाशिक : मित्रांसोबत गंगापूर धरण येथील बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२३) घडली. यश रमेश चक्रधर (१८, रा. संत कबीरनगर) असे तरुणाचे नाव आहे.

यश मंगळवारी (दि.२३) दुपारी घरातून जेवण केल्यानंतर घराबाहेर गेला. मित्रांसोबत तो गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गेला. तिथे दुपारी ३ वाजता ते पाण्यात उतरले. यशला पोहता येत नसल्याने व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. मित्रांनी आरडाओरडा केला. यशचा लहान भाऊ भारत याने त्याला पाण्याबाहेर काढले. नातलगांनी यशला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. यशच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर नातलगांनी आक्रोश केला. यशच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.