नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग

ग्रामसेवक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांची बदली करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामसेवकांच्या तक्रारी करत बदल्यांची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांच्या बदल्यांचे संकेत दिले.

आ. झिरवाळ व खोसकर यांनी जि.प.मध्ये येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही ग्रामसेवकांच्या तक्रारींचा पाढा वाचला होता. अनेक ग्रामपंचायतींमध्ये वर्षानुवर्षे ग्रामसेवक ठाण मांडून आहेत. त्यामुळे कामांमध्ये अडथळा येत आहे. जलजीवन मिशनच्या अनेक योजना अद्याप सुरू झालेल्या नाहीत, यास केवळ ग्रामसेवक जबाबदार असल्याचेही दोघांनी सांगितले. अनेक योजनांमध्ये ग्रामसेवक ठेकेदार झाल्याचीही तक्रार यावेळी आ. खोसकर व झिरवाळ यांनी केली. ग्रामसेवकांविरोधात तक्रारी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामसेवकांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी दोघांनी केली. मित्तल यांनी ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्याचे सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग appeared first on पुढारी.