नाशिक : ट्रक आडवा लावून वऱ्हाडींना मारहाण

मारहाण,www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथून पाटोदामार्गे चुलत भावाच्या हळद कार्यक्रमासाठी जाताना वेळापूर जवळील पुलावर ट्रकचालकाने ट्रक रोडच्या मधोमध उभी करून दहा ते बारा साथीदारांसह फिर्यादी गोरखनाथ एकनाथ कांदळकर यांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी कांदळकर व इतर नातेवाईक हे खासगी बसने लासलगावकडून पाटोदाकडे जाताना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास लासलगाव ते पाटोदा रोडवर वेळापूरजवळ ट्रक क्रमांक एम. एच.१५ व्ही ५५७७ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या मधोमध उभी करून त्यांचे सोबतचे इतर चार ते पाच साथीदार ट्रकसमोर मस्ती करत होते. यामुळे फिर्यादी यांनी बसमधून खाली उतरून ट्रक बाजूला घ्या, असे सांगण्यास गेले असता आरोपींना त्यांच्या बोलण्याचा राग आल्याने यातील ट्रकचालकाने टॉमी व इतर एका आरोपीने हातामध्ये दगड घेऊन फिर्यादीस मारहाण केली. या वेळी खासगी बसमधील चालक, क्लिनर, फिर्यादीची आई गयाबाई एकनाथ कांदळकर, महेश गोरख कांदळकर, पुंडलिक हिरामण कांदळकर हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही या लोकांनी मारहाण केल्याने मुक्का मार लागला.

आरोपींनी त्यांच्या साथीदारांना फोन करून बोलावल्याने पुन्हा पाच-सहा साथीदारांनी जागेवर येऊन फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण, शिवीगाळ करून तुम्ही या रस्त्याने कसे येतात तेच पाहतो, असा दम दिला. चुलतभाऊ कानिफनाथ हिरामण कांदळकर यांनादेखील टॉमीने व दगडाने मारहाण करून दोघांचे डोके फोडले व इतर आरोपींनी फिर्यादीच्या बसवर दगडफेक करत बसची समोरील व बाजूकडून काच फोडून नुकसान केले. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नवनाथ नाईकवाडे करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : ट्रक आडवा लावून वऱ्हाडींना मारहाण appeared first on पुढारी.