
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोयता बाळगून फिरणाऱ्या संशयितास गुन्हे शाखेतील दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. आदित्य संतोष सोळसे (२१, रा. तिवंधा लेन, भद्रकाली) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पथक भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना आदित्यबद्दल माहिती मिळाली.
फळविक्री करणारा आदित्य हातात शस्त्र घेऊन फिरत असल्याचे कळताच पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कोयता आढळून आला. त्याच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- पुणे : कोवळ्या वयातच गुन्हेगारीच्या वाटेवर जाणार्यांच्या पाठीवरील ’हात’ आता पोलिस शोधणार
- पुणे : त्याने रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव; पण…!
- नेवासा : डायल 112 वर कॉल; मी मर्डर केला? खोटी माहिती देणारे जेलमध्ये
The post नाशिक : फळविक्रेता हातात कोयता घेऊन फिरत होता, पोलिसांनी आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.