नाशिक : भयानकच….!  गोदापात्रात आढळला मुंडके नसलेला मृतदेह

मृतदेह www.pudhari.news

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात एका तरुणाचा मुंडके छाटलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून हा मृतदेह कोणाचा, त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवार (दि. 11) रोजी सायंकाळच्या सुमारास सायखेडा शिवारातील गंगानगर देवी मंदिराजवळील गोदावरी नदीपात्रात एका 28 ते 30 वर्षीय अनोळखी तरुणाचा मुंडके छाटलेल्या अवस्थेतील मृतदेह गोणपाटामध्ये बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मयताच्या अंगावर तपकिरी काळा पिवळा हाफ शर्ट असून निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. मनगटावर पिवळ्या रंगाचा रबर बँड असून हातावर हितेश आणि माँ तसेच तीन स्टार गोंदलेले आढळून आलेले आहे. याबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून सदर मृतदेह कोणाचा आहे त्याचा खून कोणी व का केला आणि मुंडके कोठे गायब करण्यात आले… याबाबत पोलिस अनभिज्ञ असून याप्रकरणी कोणाला अधिक माहिती असल्यास तातडीने सायखेडा पोलीस ठाण्यात सुचित करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : भयानकच....!  गोदापात्रात आढळला मुंडके नसलेला मृतदेह appeared first on पुढारी.