नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.21) नाशिक महापालिकेच्या मुख्यालय व विभागीय कार्यालयात अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शहरात 12 लाख 372 इतक्या मतदारांची संख्या अंतिम ठरली आहे.

प्रारूप मतदारयादी 23 जूनला प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर 3496 हरकती प्राप्त झाल्या होत्या. हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन काही हरकती अंशत: मान्य, काही मान्य व काही अमान्य करण्यात आलेल्या आहेत. अमान्य झालेल्या हरकती वगळून मान्य झालेल्या हरकतींनुसार प्रारूप मतदारयादीत बदल करून अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या अंतिम मतदारयाद्या नागरिकांना पाहणीसाठी विभागीय कार्यालय तसेच राजीव गांधी भवन मुख्यालय येथे कार्यालयीन दिवशी व वेळेत पाहणीकरिता ठेवण्यात आलेल्या आहेत. मतदारयाद्यांची राजीव गांधी भवनातून विक्री होणार आहे. मतदारयादीची किंमत प्रतिपृष्ठ एका बाजूकरिता दीड रुपये, दोन्ही बाजूंकरिता तीन रुपये याप्रमाणे एकूण पृष्ठांची होणारी रक्कम सर्वसाधारण पावतीद्वारे भरणा केल्यानंतर, उपलब्ध असल्यास त्याच दिवशी, नसल्यास छपाई करून दुसर्‍या दिवशी निवडणूक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. काही दिवसांकरिता नागरिकांच्या सोयीसाठी सर्वसाधारण पावतीचा भरणा करण्याकरिता, निवडणूक विभागामध्ये कर विभागातील कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एकूण मतदार 1200372, पुरुष 629682, स्त्री 570636 इतर 54 इतके आहेत.

मतदारयाद्या संकेतस्थळावर प्रसिद्धीची प्रतीक्षा
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्यांच्या प्रसिद्धीला राज्य निवडणूक आयोगाने दोन वेळा मुदतवाढ देऊनही गुरुवारी (दि.21) रात्री उशिरापर्यंत अंतिम मतदारयाद्या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये यादीची एक प्रत प्रसिद्ध करत प्रशासनाने आयोगाने निर्धारित केलेली प्रसिद्धीची वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्राप्त 3847 पैकी किती हरकती मान्य आणि किती अमान्य झाल्या, याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकली नाही.

अनुक्रमे,

प्रभाग, पुरुष, स्त्री, इतर, एकूण

1 17731 16354 0 34085
2 13223 12412 1 25636
3 14987 13696 1 28684
4 15104 13527 1 28632
5 19722 16942 2 36666
6 14682 13996 0 28678
7 11227 11202 2 22431
8 19582 17402 1 36985
9 14938 14352 0 29290
10 13748 13015 1 26764
11 12881 11674 0 24555
12 10622 8718 0 19340
13 13629 10945 0 24574
14 16848 14011 0 30859
15 14704 12114 0 26818
16 12331 11451 0 23782
17 13982 13278 0 27260
18 16917 17554 1 34472
19 15767 15265 1 31033
20 13649 12873 38 26560
21 14250 13359 0 27609
22 16424 14650 1 31075

23 14432 13389 0 27821
24 12980 12351 0 25331
25 12254 11532 0 23786
26 13799 13352 0 27151
27 14944 13975 0 28919
28 11768 11305 3 23076
29 14185 13655 0 27840
30 17324 16026 0 33350
31 15028 13436 0 28464
32 17043 15118 0 32161
33 12493 10297 0 22790
34 12624 8759 0 21383
35 17403 14556 0 31959
36 16368 12882 0 29250
37 10581 9411 0 19992
38 12211 10949 0 23160
39 16973 15298 0 32271
40 5049 4573 0 9622
41 13073 12691 0 25764
42 14180 13036 1 27217
43 13055 12268 0 25323
44 14967 12987 0 27954

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध appeared first on पुढारी.