
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भद्रकाली परिसरात नाशिक मध्यवर्ती मार्केट (Nashik Central Market) परिसरात आता सीसीटीव्ही (cctv) च्या माध्यमातून नासिक पोलीस आयुक्तालयाची नजर संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर राहणार आहे. याकरीता भद्रकालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या हस्ते मार्केट परिसरात सीसीटीव्ही बसविणे कामी भूमीपूजन करण्यात आले होते. हे कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर त्याची पाहणी करण्यात आली.

नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरात व्यापारासाठी व विविध खरेदीसाठी नागरिकांचे ये-जा असते. त्यांच्या सुरक्षतेसाठी व कायदा सुव्यवस्थेवर अंकुश राहण्यासाठी नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांच्या सहकार्याने नाशिक मध्यवर्ती मार्केट (Nashik Central Market) ला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी भद्रकाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांचा मार्फत करण्यात आली. याप्रसंगी स्मार्ट सिटीचे प्रतिनिधी भूषण खैरनार, मिलिंद चौधरी, जुड जॉकी प्रशांत महाजन, दिनेश आहिरे तसेच नासिक सेंट्रल मार्केटचे अध्यक्ष चेतन शेलार, निलेश शेलार, राहुल ठाकरे, विजय जाधव, गणेश मांडले, किशोर साळवे, अतुल विसे नागरिक व्यापारी उपस्थित होते.
हेही वाचा:
- नाशिक सेंट्रल मार्केट आता सीसीटीव्हीच्या निगराणीत; भूमीपूजन कार्यक्रम
- जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा!
- संरक्षण क्षेत्र अस्वच्छ तलाव नसून वाहणारी नदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले मत
The post नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरातील सीसीटीव्हीची कॅमेऱ्याची पाहणी appeared first on पुढारी.