नाशिक येथील डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाण्यात अटक

अटक

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील एका डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाणे खंडणी विरेाधी पथकाने बाळकुम परिसरातून आज (दि.२१) अटक केली. सदर महिला नाशिक येथील डॉक्टरास ब्लॅकमेल करून ५० लाखांची मागणी करीत होती. पैसे न दिल्यास हत्येची धमकी या महिलेने डॉक्टरास दिली होती, असे पोलीस तपासातून समोर आले आहे. Thane News

याबाबत अधिक माहिती अशी की,  ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, नेहा जाधव ( वय 47, रा. बाळकुम, ठाणे) ही महिला नाशिक येथील  व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीची सुपारी देऊन खून करण्यासाठी मारेकऱ्यांच्या शोधात आहे. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने बनावट मारेकरी म्हणून एका व्यक्तीला पाठवून मिळालेल्या बातमीची खातरजमा केली. Thane News

दरम्यान, नेहा जाधव याने बनावट मारेकरी म्हणून पाठविलेल्या व्यक्ती नाशिकस्थित डॉक्टर किरण बेंडाळे यांचा खून करण्यासाठी तीन लाखांची सुपारी दिली. किरण बेंडाळे यांचा फोटो, काम करण्याचे ठिकाणाची माहिती, विषारी इंजेक्शन, सिरींज बनावट मारेकऱ्यास दिले. त्यानंतर पोलिसांनी महिलेस सुपारीची रक्कम देताना आज रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणी महिलेविरोधात कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी महिलेस न्यायालयाने 24 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा 

The post नाशिक येथील डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाण्यात अटक appeared first on पुढारी.