नाशिक : शालिमार येथील अनधिकृत अतिक्रमण हटवले, दुकाने जमीनदोस्त

शालिमार अतिक्रमण हटवले

नाशिक : पुढारी ऑनलाइन

नाशिक मनपाने पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यास सुरुवात केली असून शहरातील शालिमार परिसरातील अनधिकृत अतिक्रमण काढण्यात आले आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात सकाळपासून ही कारवाई सुरु असून पालिकेने येथील दुकाने हटविल्याने व्यावसायिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

शालीमार परिसरातील शहाजहानी पीरजादा कब्रस्तानला लागून असलेल्या अनेक दुकानांवर अतिक्रमण विभागाने हातोडा फिरवला आहे. यामुळे या परिसरातील सुमारे २५ ते ३० दुकानांचे अतिक्रमण धोक्यात आले आहे. दरम्यान मनपा व पोलीस प्रशासनाकडून काल संध्याकाळी या दुकानदारांना सूचना देण्यात आली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी नोटीसाही बजावण्यात आल्याचे समजते.

दरम्यान आज सकाळी पहाटे साडेसहा वाजता मनपाकडून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शालिमार येथील कालिदास कलामंदिर रस्त्याच्या कडेला गेल्या अनेक वर्षांपासून असलेली दुकाने महापालिकेने आज पहाटे हटवली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त देखील होता.

हेही वाचा :

The post नाशिक : शालिमार येथील अनधिकृत अतिक्रमण हटवले, दुकाने जमीनदोस्त appeared first on पुढारी.