नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नवीन शैक्षणिक धोरणानुसार नाशिकसह राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. अद्याप अनेक घटक संभ्रमावस्थेत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या ३,२६५ प्राथमिक शाळेमध्ये अंगणवाडी तसेच पहिली ते तिसरीपर्यंत निपुण भारत अभियान पॅटर्न (NIPUN Bharat Mission 2024) राबविले जाणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान प्राप्त होईल. याअंतर्गत गणिताची आकडेवारी, सामान्यज्ञान तसेच आवडेल अशा शिक्षणक्रमावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर कनोज यांनी दिली.
निपुण पॅटर्नअंतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना ९९ पर्यंतची आकडेमाड, दुसरीच्या विद्यार्थ्यांना ९९९ पर्यंत आकडेमोड, तर तिसरीच्या विद्यार्थ्यांना ९९ हजार ९९९पर्यंतची आकडेमोड शिकविली जाणार आहे. याचबरोबर २०२५-२६पर्यंत या मुलांना कौशल्याधिष्ठित शिक्षणक्रम शिकविण्याची तयारी करण्यात येणार आहे. मुले जसजशी पुढील इयत्तेत जातील त्याप्रमाणे त्यांच्या शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक ती तयारी नाशिक जिल्हा परिषदेकडून पूर्ण झाली आहे. परिणामी गेल्या वर्षापासून शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत वाचन व अंकगणित कौशल्ये शिकवणे हे निपुण भारत अभियानाचे उद्दिष्ट आहे. सन २०२६-२७ पर्यंत या अभियानाद्वारे इयत्ता तिसरीच्या शेवटी विद्यार्थी वाचू, लिहू आणि गणित करू शकतील.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर
निपुण भारत योजना मुलांना मूलभूत साक्षरता आणि अंककौशल्ये वेळेवर शिकण्यास मदत करेल. यामुळे त्यांची मानसिक व शारीरिक क्षमता विकसित होण्यास मदत होईल. शिक्षण आणि साक्षरता विभाग निपुण भारतचे व्यवस्थापन करेल. ही योजना शालेय शिक्षण कार्यक्रम समाज शिक्षासोबत एकत्रित केली जाईल. ही योजना नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित आहे. निपुण भारत योजना मुलांना संख्या, माप आणि आकार यांचे तर्कशास्त्रदेखील शिकवणार
हेही वाचा:
- Tamilisai Soundararajan resigns | ब्रेकिंग! तमिलिसाई सुंदरराजन यांचा राज्यपालपदाचा राजीनामा
- साडवली बैलगाडा स्पर्धा : खेर्डे कातळवाडीच्या सचिन म्हादे यांची बैलजोडी प्रथम
- ऐन निवडणुकीत ध्रुवीकरणाची तजवीज !
The post निपुण पॅटर्न : विद्यार्थ्यांना प्राप्त होणार अद्ययावत ज्ञान; शिक्षणक्रमावर भर appeared first on पुढारी.