नाशिक रोड : पुढारी वृत्तसेवा
येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्याने गळफास घेत जीवन संपवून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. सौरभ राजू ढगे (२७, रा. मामलेदार चौक, निफाड) असे कैद्याचे नाव आहे. सौरभ हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी कैदी म्हणून शिक्षा भोगत होता. शनिवारी (दि. 9) पहाटे 3.30 च्या सुमारास त्याने कारागृहातील सेपरेट विभागातील रूम नंबर १७६ मध्ये दरवाजाच्या चौकटीला टॉवेलने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर कारागृह शिपाई दिलीप सोनार याने याबाबत कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निळकंठ ससाणे यांना माहिती दिली. त्यांनी सौरभ यास तपासून मृत घोषित केले आहे.
हेही वाचा:
- पुढारी विशेष | अबब…! राज्यातील कारागृहे हाउसफुल्ल
- नाशिक : दाढी-कटिंग करणं महागणार…! काय आहे कारण
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न करा; अन्यथा एक एप्रिलपासून निधी नाही
The post न्यायबंदी कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा कारागृहात अखेरचा श्वास appeared first on पुढारी.