पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा ठळक मुद्दे

माझे भाग्य आहे की,

आजचा दिवस हा भारतातील युवा शक्तीचा दिवस आहे. स्वामी विवेकानंद यांना हा दिवस समर्पित आहे, माझे भाग्य आहे की, आजच्या दिवशी मी नाशिकमध्ये आहे. त्यासोबतच आज राजमाता जिजाऊ यांचीही जयंती आहे. त्यांना मी वंदन करतो. हा केवळ योगायोग नसून नाशिक या पुण्यभूमीचा व तपोभूमीचा हा प्रभाव आहे. राज माता जिजाऊंनीच छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महानायकास जन्म देऊन गडवले. याच भूमीने देवी अहिल्या, रमाबाई आंबेडकर या महान नारिशक्ती तर लोकमान्य टिळक, वीर सावरकर, दादासाहेब पोतनीस, चाफेकर बंधू, आनंत कन्हे असे वीर जन्मास आले.

22 जानेवारीला मंदिरांत साफसफाई करा,

प्रभू रामचंद्रांनी नाशिकमध्ये दिर्घकाळ वास्तव्य केले. या रामभूमीला मी प्रणाम करतो. ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरात जाण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले. देशातील सर्व मंदिराची 22 जानेवारी पर्यंत स्वच्छता करावी असे आवाहन केले होते. 22 जानेवारीला देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवा तसेच श्रमदान करा असे आवाहन मोदींनी केेले.

अमृतकाळात इतिहास घडविण्याची संधी,

हा अमृतकाळ आहे. युवकांना या काळात देशासाठी काम करण्याची मोठी संधी आहे. देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी या काळखंडात चांगले काम करा. नवा इतिहास रचण्याची तुम्हाला संधी आहे. या पिढीला मी सर्वात भाग्यशाली समजतो. भारताचे लक्ष ही युवा पिढी निश्चित साधेल असा मला विश्वास आहे.

या दहा वर्षात आमच्या सरकारने,

आमच्या सरकारला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षात आम्ही युवकांसाठी मोठे कार्य केले असून युवकांसाठी मोकळे आकाश खुले केले आहे. शिक्षा, रोजगार, स्टार्टअप, स्पोर्टस यासह विविध क्षेत्रात नवी दारे तरुणांसाठी खुली झाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश प्रगती करतो आहे. विश्व कर्मा योजनेच्या माध्यमातून करोडो युवा जोडले गेले आहेत. आज पूर्ण जग भारताला कौशल्यपूर्ण राष्ट्र म्हणून बघत आहेत. फ्रान्स जर्मनी, युके ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांसोबत भारताने जे समजोते केले त्याचा फायदा भारतातील युवकांना होतो आहे.

भारताला विश्वाचे मॅन्युफॅक्चरिंग हब ,

भारतीय अर्थव्यवस्था ही एक सक्षम अर्थव्यवस्था आहे. जगातील 5 व्या नंबरची अर्थव्यवस्था आपली असून भारताला टॉप 3 इकोसिस्टिमध्ये आणण्याचे लक्ष आहे. भारताला विश्वाचे मॅन्युफॅक्चरिंग हब बनावयचे आहे. भारताचा युवा योग-आयुर्वेदाचा ब्रॅण्डअबेसिडर बनत आहे. एकापेक्षा अधिक इनोवेशन करत आहे.  अमृतकाळातील आजची युवापिढी ही गुलामी मुक्त व दबाव मुक्त असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

राजकारणात या, घराणेशाही संपवा

भारत हा मदर ऑफ डेमोक्रसी आहे. लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत देशातील युवकांचा सहभाग जितका अधिक वाढेल तितके देशाचे भविष्य उज्वल होईल. या देशाचा युवक हा या देशाचे सामर्थ्य आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांनी राजकारणात यायला हवे. भारतीय युवा राजकारणात आल्यास घराणेशाहीतील राजकारण संपुष्टात येईल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना केले.

युवकांनो मतदान करा,

जे तरुण राजकारणात येणार नाहीत त्यांनी किमान मतदान हे करायलाच हवे, जे युवक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, ते परिवर्तन घडवून आणू शकतात. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव येण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रीया पू्र्ण करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. मतदान करुन देशाच्या विकासात आपला सहभाग नोंदवा. त्यासाठी जास्तीत जास्त मतदान करा असे मोदी म्हणाले.

मेक इन इंडियाला प्रोत्साहन द्या

देशातील युवक जेव्हा आपल्या अधिकारांसोबतच आपल्या कर्तव्याचे पालन करेल तेव्हाच देश व समाजाची उन्नती होईल. त्याचाठीच युवकांनी मेड इन इंडियाला प्रोत्साहन द्या. देशात निर्मित झालेल्या प्रोडक्टचा वापर करावा.

आमली पदार्थांचे सेवन करु नका

कोणत्याही प्रकारच्या आमली पदार्थांचे सेवन करु नका, मद्याचे सेवन करु नका असे आवाहन त्यांनी युवकांना केले.

आई-बहिणीच्या नावाने शिव्या देऊ नका…

आई-बहिणीच्या नावाने शिव्या देणे बंद करा असे आवाहन मोदींनी युवकांना केले.

The post पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा ठळक मुद्दे appeared first on पुढारी.