नाशिक : उपनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील उपनगर परिसरातील हनुमंतनगर येथील एका ज्येष्ठ महिलेचा रविवारी ( दि. १८ ) रोजी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली आहे. सदरील महिला राहत्या घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. त्याचप्रमाणे तिच्या डोक्यात जखम होऊन मोठा रक्तस्त्राव देखील झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

सुरेखा उर्फ पुष्पा श्रीधर बेलेकर (60, रा.  हनुमंत नगर स्कीम नंबर एक स्वानंद रोड हाऊस ) असे महिलेचे नाव आहे .त्यांना दीपक , विवेक नावाची दोन मुले सुन आहे. रविवारी ( दि. १८ ) सायंकाळी दूधवाला दूध देण्यासाठी सदरील महिलेच्या घरी आला होता. त्यावेळी महिलेने दरवाजा उघडला नाही तसेच कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दूधवाल्याने सदरील माहिती जवळच माहेर असणाऱ्या मयत महिलेच्या सुनेला कळवली. त्यानंतर सून तातडीने घरी आली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मागच्या दाराने घरात गेल्यानंतर आपली सासू जमिनीवर खाली पडलेली सुनेला दिसली. त्याचप्रमाणे त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याची दिसले. यावेळी घरातील टीव्ही, फॅन चालू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान जखमी महिलेला बिटको रुग्णालयात दाखल केले. उपचारदारम्यान डॉक्टरांनी महिलेला मयत घोषित केले. सर्व शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे तसेच कर्मचारी प्रवीण चौधरी, अतुल पाटील राहुल जाधव दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

हेही वाचा:

The post नाशिक : उपनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.