पखाल रोडवर महिलेचा विनयभंग

विनयभंग ,www.pudhari.news

नाशिक : आर्थिक व्यवहारांबाबत चर्चा करताना दाेघांनी मिळून महिलेस जबरदस्ती घरात नेत विनयभंग केल्याचा प्रकार पखाल रोडवर घडला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकाश गांगुर्डे, त्याचे दोन मित्र व एका महिलेविरोधात विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार रविवारी (दि.४) सकाळी साडेदहाला हा प्रकार घडला.

कृषीनगरला रहिवाशावर हल्ला

नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून दोघांनी मिळून विनोद खैरनार (४७, रा. मखमलाबाद नाका) यांच्यावर शस्त्राने हल्ला केल्याची घटना कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळ घडली. विनोद यांच्या फिर्यादीनुसार, संशयित दादु गांगुर्डे व त्याच्या मित्राने शनिवारी (दि.३) दुपारी कुरापत काढून शस्त्राने वार करून दुखापत केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पेअरपार्टवर दोघा नोकरांचा डल्ला

नाशिक : वाहन शोरुममध्ये काम करणाऱ्या दोघांनी किंमती ऐवज चाेरल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पियुष नहार (रा. भगुर) यांच्या फिर्यादीनुसार, भगुर पांढुर्ली रोडवरील शोरुममध्ये संशयित अल्तमश शेख (१९, रा. भगूर) व ओम थापा (२६, रा. संसरी गाव) हे कामास आहेत. दोघा संशयितांनी शुक्रवारी (दि.२) शोरुममधून २१ हजार ४०० रुपयांचे ऑइल व दुचाकी वाहनांचे महागडे स्पेअरपार्ट चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अल्तमश यास अटक केली आहे.

हेही वाचा :

The post पखाल रोडवर महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.