नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा दौऱ्यावर निघाले असून नाशिकच्या दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगावचा दौरा करणार आहेत. आज ते भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले आहेत. तर दिंडोरी तालुक्यात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे नुकतेच जंगी स्वागत करण्यात आले. तालुक्यातील तळेगाव दिंडोरी व पिंपळणारे फाटा येथे मराठा बांधवांच्या गर्दीत मनोज जरांगे पाटील यांचा पुष्पवृष्टीने जंगी स्वागत करण्यात येत आहे. यावेळी मोठ्या संख्येन मराठा समाज त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
The post पुष्पवृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचे दिंडोरीत स्वागत appeared first on पुढारी.