पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा – पेठ रोडवरील दत्तनगर पाटाच्या बाजूला असलेल्या हरिओम नगरमध्ये मंगळवारी (दि.२१) पहाटे चार ते पाच दुचाकी व रिक्षाची काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना घडली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक उत्तमराव उगले यांच्या उगले सदन परिसरात काही भाडेकरू वास्तव्यास आहेत. या पैकी काही नोकरी तर काही व्यवसाय करतात. या सर्वांची वाहन घराच्या आवारातच उभी करत केली जातात. मंगळवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून पेठ रोडमार्गे सात-आठ समाजकंटक हातात दांडके घेऊन येथे आलेत. त्यांनी उगले यांच्या वाहनासह मनोज चंदनशिव, सागर चंदनशिव आणि मोरे यांच्या दुचाकी व रिक्षाची तोडफोड केली. हा आवाज एेकून जवळच्या घरातील वृद्ध महिला व त्यांचा मुलगा यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र हल्लेखोरांनी शिविगाळ करीत वाहनात बसून पोबारा केला. पंचवटी पोलिसांनी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली.
नजीकच्या झोपडपट्टीतील काही समाजकंटकांनी या वाहनांची तोडफोड केल्याचा संशय आहे. या प्रकरणाला सध्याच्या राजकीय वातावरणाचा तथा निवडणुकीचा रंग देण्याचा त्यांचा डाव असून या प्रकरणात काही पुढाऱ्यांचा देखील हात असल्याची दाट शक्यता वाटते. ही प्रवृत्ती विघातक असून त्यांना पोलिसांनी वेळीच आवर घालावा. – उत्तमराव उगले, माजी नगरसेवक.
हेही वाचा: