नाशिक पुढारी वृत्तसेवा ; तरुणीशी प्रेमसंबंध करीत तिच्यासमवेतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एकाने ४० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित अभिजित नरेंद्र अहिरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिची संशयित अभिजितशी २००७ मध्ये ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेत अभिजितने तरुणीबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. या कालावधीत तिने उच्च शिक्षण घेत एका शैक्षणिक संस्थेत नोकरी केली. तर अभिजित बेरोजगार होता. त्याने सुरुवातीस वेगवेगळी को गे देत तरुणीकडून पैसे घेतले मात्र ते परत केले नाहीत. त्यानंतर त्याने तरुणीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैसे मागण्यास सुरुवात केली. बदनामी होण्याच्या भीतीने तरुणीने अभिजितला वेळोवेळी ४० लाख रुपये दिले. त्यासाठी तिने ओळखीच्यांकडून उसनवारी किंवा कजनि पैसे घेतले. त्यानंतरही अभिजितकडून पैशांची मागणी होत असल्याने तरुणीने मुंबई नाका पोलिसांकडे अभिजितविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयित अभिजित हा आखाती देशात असल्याचा संशय आहे.
हेही वाचा :
- Sudan Abyei Clash | सुदानच्या अबेईत रक्तरंजित संघर्ष, UN शांतीदूतासह ५२ ठार, नेमका वाद काय?
- Pariksha Pe Charcha 2024 : विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये तणाव कसा टाळायचा, पंतप्रधान मोदींनी दिला ‘हा’ सल्ला
- Jitendra Awhad On Rahul Narvekar : ‘यापेक्षा मोठी शोकांतिका काय’; राहुल नार्वेकरांबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत
The post फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळले 40 लाख appeared first on पुढारी.