बुलेटचे टायर फुटून अपघातात चालक ठार

Accident

चांदवड पुढारी वृत्तसेवा – भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेटचे टायर फुटून दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात ४५ वर्षीय बुलेट चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत तुषार गोयल (४७, मनमाड) यांनी फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार (दि. 30) हा अपघात झाला.

मनमाड येथील रहिवाशी दीपक प्रकाश गोयल (४५) हे बुलेटने (एम.एच.४१, बीजी ९३९९) नाशिकहून मनमाडकडे येत होते. चांदवड तालुक्यातील दुगाव येथील चांदवड मनमाड रोडवर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्यावर पडली. यामुळे दुचाकीचा भीषण अपघात होऊन दीपक गोयल यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भाऊसाहेब गुळे करीत आहे.

The post बुलेटचे टायर फुटून अपघातात चालक ठार appeared first on पुढारी.