एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहर-परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) द्रुतगती परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला आहे. शहराभोवतीच्या या ६५.४१ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ४००.९३ हेक्टर जागेची आवश्यकता असून प्रकल्पासाठी २ हजार ६०४.४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन सिंंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी परिक्रमा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न आहे.

नाशिकचा वाढता विस्तार तसेच २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते अपुरे पडत आहेत. दिवसाकाठी शहरातील सर्व प्रकारच्या वाहनांच्या संख्येत वाढ होत असतानाच परजिल्हा व राज्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. यासर्व बाबींचा विचार करुन शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासानूसार नाशिकचा वाढता विस्तार बघता सध्याचे रस्ते हे अपुरे पडत आहेत. तसेच अवजड वाहनांमुळे ठिकठिकाणी नाशिककरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे भविष्यातील नाशिकचा विचार करता एमएसआरडीसीने परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित मार्गामुळे अवजड वाहने थेट परिक्रमा मार्गाने वळविणे शक्य होणार आहे.

प्रकल्पासाठी अहवाल
नाशिक परिक्रमा मार्ग प्रस्तावित सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड मार्गाला जोडण्यात येणार आहे. परिक्रमा मार्ग प्रकल्पाची व्यवहार्यता व सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी एमएसआरडीसीने मेसर्स मोनार्च सर्व्हेअर्स अँड इंजिनीयरिंग कन्सल्टन्ट कंपनीला दिल्याचे समजते.

हेही वाचा:

The post एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग appeared first on पुढारी.