फडणवीसांच्या शब्दानंतरही लेखी आश्वासनावर ‘बिऱ्हाड’ ठाम

बिऱ्हाड मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शासनदरबारी विविध मागण्यांसंदर्भात नंदुरबार येथून प्रयाण केलेला बिऱ्हाड मोर्चा रविवारी (दि. १७) नाशिकच्या वेशीवर धडकला. यादरम्यान, नागपूरला शासनाशी चर्चेसाठी गेलेल्या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोन दिवसांत धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन लेखी आश्वासनाचे पत्र घेऊन येतील, असे सांगत, मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली होती. मात्र, लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. ठरल्याप्रमाणे हा मोर्चा साेमवारी (दि. १८) मुंबईकडे कूच करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आदिवासी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जमीन व जंगल हक्क; शेतमालाला रास्त भाव, दुष्काळग्रस्तांच्या समस्या, भूसंपादन तसेच गायरान हक्कांसह निरनिराळ्या मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी 66666666666666666666666666सभा यांच्या मार्गदर्शनाखाली हा बिऱ्हाड माेर्चा काढण्यात आला आहे. नंदुरबार येथून दि. ७ डिसेंबरला मार्गस्थ झालेला हा मोर्चा नाशिकच्या वेशीवर असलेल्या आडगाव ट्रक टर्मिनस येथे पोहोचला. याचदरम्यान, शासनाने मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी नागपूर येथे पाचारण केले होते. शासनाशी झालेल्या चर्चेवेळी काही मागण्या मान्य झाल्या, परंतु, काहींबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यावर शिष्टमंडळ कायम राहिले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टाई करत, येत्या दोन दिवसांत मंत्री महाजन हे शासनाचे आश्वासनपत्र घेऊन आपल्याला भेटतील, तेव्हा आंदोलन मागे घेण्याचे विनंती त्यांनी केली. जेव्हा हे पत्र मिळेल, त्याक्षणी माघार घेऊ असा निर्धार बोलून शिष्टमंडळ माघारी फिरले.

मोर्चेकरी आपल्या वाटचालीवर कायम असून, सोमवारी (दि. १८) सकाळी ८ वाजता आडगाव येथून मार्गस्थ होतील. गोल्फ क्लब मैदानावर येऊन, एक शिष्टमंडळ विभागीय महसूल आयुक्त व आदिवासी आयुक्तांची भेट घेईल. या घडामोडीत आश्वासनपत्र मिळाले नाही, तर ‘बिऱ्हाड’ मुंबईकडे प्रयाण करेल, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post फडणवीसांच्या शब्दानंतरही लेखी आश्वासनावर 'बिऱ्हाड' ठाम appeared first on पुढारी.