भाजपच्या पक्षचिन्हासोबत छेडछाड, काँग्रेसच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

इंदिरानगर पोलिस ठाणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर पक्षचिन्हाशी छेडछाड करीत विद्रूपीकरण केल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या सहा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हृषिकेश शिरसाठ (२३, रा. चार्वाक चौक) याच्या फिर्यादीनुसार, पंकज सोनवणे, महेश देवरे, देवेन मारू, गणेश कोठुळे, हेमंत पवार व सागर पिंपळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर भाजपच्या पक्षचिन्हासोबत छेडछाड करीत त्याचे छायाचित्र अपलोड केले होतेे. भाजपतर्फे शहरातील भिंतीवर पक्षचिन्ह व ‘अबकी बार फिर से मोदी सरकार’ अशी जाहिरात केली आहे. मात्र युवक काँग्रेसच्या वतीने या जाहिरातीत छेडछाड करीत काँग्रेसचे पक्षचिन्ह हाताचा पंजा व ‘रोजगार दो न्याय दो’ असा संदेश लिहून विद्रूपीकरण केले. त्यामुळे सहा पदाधिकाऱ्यांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेंसमेंट ऑफ ॲक्ट १९९५ च्या कलम तीन नुसार हा गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा

The post भाजपच्या पक्षचिन्हासोबत छेडछाड, काँग्रेसच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा appeared first on पुढारी.