भुजबळांच्या नाराजीवर वळसे-पाटीलांचे ‘नो कमेण्ट्स’

दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने काढलेल्या अध्यादेशावर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसींना गाफील ठेऊन निर्णय घेतल्याची टीका भुजबळांनी केली आहे. याविषयी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले आहे. भुजबळ साहेब काय म्हणाले ते मला माहिती नाही. त्यांच्याशी माझे अद्याप बोलणे झालेले नाही. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर बोलणे योग्य नसल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले आहे. (Walse Patil)

नाशिक येथे आयोजित सहकार परिषदेसाठी वळसे-पाटील (दि.27) आले होते. दरम्यान सहकारपरिषदेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या प्रश्नावर त्यांनी ‘नो-कमेण्ट्स’ म्हणत याविषयी बोलणे टाळले. तसेच मराठा आरक्षणासंबधी राज्य सरकारने आज जो अध्यादेश काढला आहे, त्याविषयी पडद्यामागून काय चर्चा झाली याविषयी आपण अनभिज्ञ असून, माहिती घेवूनच बोलणे अधिक संयुक्तिक होईल असे वळसे पाटील म्हणाले.

वळसे-पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाच्या आंदोलनावर राज्य सरकार सुरुवातीपासूनच सकारात्मक होते. त्यानुसार सरकारने समाजाच्या हिताचा निर्णय घेतला असून, त्याचा मराठा समाजातील नागरिकांना निश्चितपणे फायदा होईल असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

The post भुजबळांच्या नाराजीवर वळसे-पाटीलांचे 'नो कमेण्ट्स' appeared first on पुढारी.