वणी : पुढारी वृत्तसेवा
जल, जंगल, जमीन या अधिकारापासून आदिवासी वंचित आहेत, त्यांना तो अधिकार मिळाला पाहिजे. नार-पार प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पाऊसपाणी लगतच्या राज्यात वाहून जाते. सिंचन व पिण्याच्या पाण्याची पूर्तता करण्यासाठी, सर्वांना मतभेद विसरून एकाच व्यासपीठावर येऊन या समस्येचे निराकारण करावे लागेल, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.१५) सांयकाळी केआरटी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सभेत ते बाेलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नितेश कराळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्सेना सलगर आदींसह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे पंधरा मिनिटांच्या भाषणात पवार यांनी अनेकविध मुद्यांना हात घातला.
जयंत पाटील यांनी मोदी सरकार सडकून टीका केली. दिंडोरी मतदार संघात आरोग्य सेवेसारखे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. नितेश कराळे यांनी वऱ्हाडी भाषेत इलेक्ट्रोल बाॅंड विषयाचा समाचार घेतला. प्रारंभी खासदार अमोल कोल्हे, शिरीष कोतवाल, अनिल देशमख, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, प्रा. राजेश सरकटे यांची भाषण झालीत. उमेदवार भगरे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा: