नाशिक पुढारी ऑनलाइन ; निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवे नाव दिले आहे. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक X पोस्ट केली आहे. “मनगट आमच्याकडेच आहे. फक्त घड्याळाची चोरी झाल्याची” टीका आव्हाड यांनी केली आहे. Jitendra Awhad
निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह व नाव हे अजित पवार गटाकडे राहील असा निर्णय दिला. त्यानंतर राज्यभरातील शरद पवार गट आक्रमक झाला असून अजित पवार गटासह निवडणूक आयोगावर टीका करण्यात येत आहे. त्यात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या भावनाही तीव्र झाल्याचे दिसते आहे. Jitendra Awhad
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवे नाव दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ही X पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अखेर सत्य सामोरे आलेच ! निवडणूक आयोगानेही नाव देतानाही कळत- न कळत हे दाखवून दिले की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे. म्हणून आम्हाला नाव मिळालं, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार”. हेच खरे जन्मदाते होते पक्षाचे. पण, काही पाकिटमारांनी घड्याळ चोरले. पण, त्यांच्या दुर्देवाने मनगट आमच्याकडेच राहिले. लढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेल. आता त्यांनी नाव घ्यावे, “एनसीपी – अलिबाबा आणि चाळीस चोर” अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. Jitendra Awhad
मनगट आमच्याकडेच आहे. फक्त घड्याळाची चोरी झाली.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 7, 2024
The post मनगट आमच्याकडेच, फक्त घड्याळाची चोरी झाली appeared first on पुढारी.