विठेवाडी गावातील अवैध वाळू उपसा थांबविण्याची बैठकीत मागणी

देवळा बैठक,www.pudhari.news

देवळा : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील गिरणा नदी काठावर असलेल्या विठेवाडी गावात मोठ्या प्रमाणावर चोरट्या मार्गाने अवैद्य वाळू उपसा केला जात असून तो त्वरित थांबविण्यात यावा अशी मागणी बुधवारी (दि. 7) रोजी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विठेवाडी ता. देवळा येथील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैद्य वाळू उपसा केला जात असल्याची ओरड नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. गावातील स्थानिक नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वाहनाद्वारे अल्प दरात वाळू उपलब्ध करून देण्याचा ठराव झाला असून, काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. गावातील काही ट्रक्टर अन्यत्र वाळू वाहतूक करीत असल्याचे गावकऱ्यांनी लक्षात आणून दिल्याने वाळू माफियांनी त्यांना दमबाजी केल्याचे सांगितले. यासंदर्भात येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी विठेवाडी, झिरेपिंपळ शिवारातील शेकडो तरुण शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीत काही गावांतील काही गावाबाहेरील वाहांनाद्धारे अवैध वाळू उपसा करतांना ग्रामस्थांनी जीवावर उदार होऊन त्यांना रंगेहाथ पकडले. यावेळी वाळू माफियांनी त्यांना अरेरावी केली. याचा ग्रामस्थांनी तातडीने बैठक घेऊन निषेध नोंदवला. यावेळी सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्त, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक उपस्थित होते. बैठकीत यापुढे अवैध वाळू उपसा करणारे वाहन जप्त करून ते मंगल कार्यालयात जमा करण्यात येणार असून सहा महिन्यांनंतर दोन लाख रुपये दंडाची आकारणी करून मगच सोडण्यात येईल. तसेच याला चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी विठेवाडी येथील दत्त मंदिराच्या गेटवर व विठेवाडी येथील चौफुलीवरील ग्रामपंचायतीने तातडीने सिसिटिव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

दरम्यान खामखेडा, सावकी, विठेवाडी येथील नागरिकांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने दि. २५ जानेवारी रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन गिरणा नदीपात्रातील वाळू लिलावास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या कार्यवाहीचे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले आहे. याप्रसंगी विठोबा सोनवणे, भास्कर निकम, पंडित निकम, कुबेर जाधव, महेंद्र आहेर, संजय सावळे, राजेंद्र निकम, सतिष निकम, धीरज निकम, मुन्ना निकम, तुषार निकम, शशिकांत निकम, पी. डी निकम, मनोज आहेर, ईश्वर निकम, माणिक निकम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :

The post विठेवाडी गावातील अवैध वाळू उपसा थांबविण्याची बैठकीत मागणी appeared first on पुढारी.