ती दोनशे रुपयांची भाडोत्री माणसं होती; सुषमा अंधारे यांची सुहास कांदेवर टीका

सुषमा अंधारे

मनमाड (जि. नाशिक) : शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुुरु झाली आहे. त्या निमित्त नाशिक जिल्ह्यातील मनमाडला अंधारे यांची सभा झाली. या सभेत अंधारे यांनी आपल्या खास शैलीत शिंदे सेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका करत सभा गाजवली.

जर कोणी गुंडागर्दीची भाषा करत असले त्याला जणशक्ती काय असते, कायदा काय असतो हे दाखवायला पाहिजे. यासाठी आज मला बोलायला लागतय मात्र, सुहास कांदे या नावावर फार वेळ वाया घालवावा असे मला वाटत नाही. माझ्याकडे बोलण्यासारखे फार महत्त्वाचे विषय आहे असेही अंधारे म्हणाल्या. अंधारे या सभेच्या ठिकाणी येत असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांना विचारले असता ती दोनशे रुपयांची भाडोत्री माणसं होती, स्टंट बाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. जो पर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे यांचे सैनिक चांदयापासून बांद्यापर्यंत पसरले आहे, तो पर्यंत शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांची गाडी अडवण्याची ताकद भाडोत्री कोणाची नाही.

तर मराठा आरक्षणावर बोलतांना अंधारे म्हणाल्या की, भाजपाकडे संख्याबळ आहे जर त्यांना खरच आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी कायदा करून केंद्राकडे पाठवावा एवढी साधी सोपी प्रक्रिया आहे. पण जाणीव पूर्वक फडणवीस सरकारकडून जाती-जातीत द्वेष पसरवला जात आहे.  महाप्रबोधन यात्रेत अडचणी निर्माण केल्या जात आहे. हे खरे आहे, या यात्रेला लोक प्रतिसाद देत आहे. आम्ही फक्त लोकाभिमुख समस्यांवर बोलण्याचा प्रयत्न करत असतो. अद्वय हिरे हे फक्त आणि फक्त आमच्या सोबत आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे. याउलट कितीतरी गंभीर गुन्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षातील काहीजण आहेत, त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. मोहित कम्बोज सारख्या व्यक्तीला सहज सोडून दिलं जात असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा :

The post ती दोनशे रुपयांची भाडोत्री माणसं होती; सुषमा अंधारे यांची सुहास कांदेवर टीका appeared first on पुढारी.