मुंबई-आग्रा महामार्गावर कारला भीषण अपघात; एक ठार, सहा जखमी 

वाडीवऱ्हे (जि.नाशिक) : रविवारी (ता. १४) दुपारी चारच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे येत असलेली कार (एमएच ०१, एआर ३३२०) रायगडनगरजवळ आली असता हा प्रकार घडला.

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-आग्रा महामार्गावर रायगडनगरजवळ कार पिक-अपवर आदळून झालेल्या अपघातात एक ठार, तर सहा जखमी झाले. जखमींपैकी एका महिलेची तब्येत चिंताजनक आहे. पाच जण किरकोळ जखमी झाले. रविवारी (ता. १४) दुपारी चारच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे येत असलेली कार (एमएच ०१, एआर ३३२०) रायगडनगरजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून नाशिकहून मुंबईकडे जात असलेल्या पिक-अपवर (एमएच१५, सीके ९५५३) जाऊन आदळली.

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.

पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा

या अपघातात एक ठार, तर सहा प्रवासी जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला.  

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह