नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या सिन्नर येथील भेटी प्रसंगी बादलीला मतदान करावे, असा संदेश देताना हाती नारळ सोपविला. नारळसोबत तुम्ही घरी राहाण्याचा आशिर्वाद दिला, असा गौप्यस्फोट अपक्ष शांतिगिरी महाराज यांनी शुक्रवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केला. मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट असल्याची त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उमदेवार सध्या गावोगावी प्रचार रॅली घेत आहेत. सिन्नर येथे गुरुवारी (दि. ९) अशाच प्रचार रॅलीदरम्यान युतीचे उमेदवार गोडसे व अपक्ष शांतिगिरी महाराज समाेरासमोर आले. या भेटीबाबात शांतिगिरी महाराज यांना विचारले असता योगायोगाने ही भेट झाली. पण या भेटीवेळी गोडसे यांना बादलीकडे लक्ष ठेवताना तुमचे मत बादलीत टाकावे. तसेच नारळ हाती देत तुम्ही या नारळासोबत घरी राहावे, असे त्यांना सांगितल्याचे शांतीगिरी महाराज यांनी स्पष्ट केले.
शांतिगिरी महाराज पुढे म्हणाले, भुजबळ फार्म येथे मंत्री भुजबळ यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेला होतो. उमेदवार म्हणून नागरिकांच्या गाठीभेटी घ्याव्याच लागणार असे सांगताना भुजबळांशी अनपाैचारिक गप्पा झाल्याचे ते म्हणाले. भाजपचे दिनकर पाटील यांच्या भेटीवर बोलताना त्यांचे व आमचे मैत्रीपूर्ण नाते आहे. आम्ही नेहमीच भेटतो असे सांगत शांतीगिरी यांनी त्यावर अधिकचे भाष्य करणे टाळले.
हेही वाचा –