येवला (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – उद्यानात खेळण्यासाठी जात असलेल्या चिमुकल्याला चिरडणाऱ्या वाहनचालकाला पकडण्यात येवला पोलिसांना यश आले आहे.
सोमवारी (दि. २७) सायंकाळी ६ च्या सुमारास घराजवळील उद्यानात खेळण्यासाठी जात असताना ५ वर्षांच्या रुद्र समाधान पागिरे याला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. बेशुद्ध अवस्थेतील रस्त्यावर पडलेल्या चिमुकल्याला मदत करण्याऐवजी वाहनचालक चक्क फरार झालेला होता.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या विठ्ठलनगर येथील स्थानिक रहिवाशांनी या अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली. त्यानुसार गुरुवारी (दि. 30) येवला शहर पोलिस ठाण्यावर मोर्चाही नेला होता. यावेळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी या आरोपीचा शोध घेतला असून, संबंधित वाहन हे ट्रॅक्टर असून, (एमएच ३०, एफ ८२६७) चालक सागर दिलीप परदेशी याला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील योग्य ती कारवाई सुरू असल्याचे जमावाला सांगून नागरिकांना शांत करण्यात आले आहे.
हेही वाचा:
The post येवला : चिमुकल्याला चिरडणारा वाहनचालक गजाआड appeared first on पुढारी.