
येवला(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- येवल्यातील प्रियंका सुरेश मोहिते हिने नुकत्याच झालेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपन्न केले असून देश पातळीवर असलेल्या रँकिंगमध्ये 595 नंबर मिळवला आहे. येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात माध्यमिक शिक्षक असलेल्या सुरेश सुकदेव मोहिते यांची प्रियंका ही मुलगी असून युपीएससी च्या दुसऱ्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. प्रियांका मोहिते हिचे वय अवघे 23 इतके असून इतक्या कमी वयात तीने यूपीएससी मध्ये यश संपादन केले. UPSC Result 2023

पहिली ते पाचवी पर्यंत स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्राथमिक विभागात प्रियंकाने शिक्षण घेतले, त्यानंतर खेडगाव येथे जवाहर नवोदय विद्यालयात तिची परीक्षेद्वारे निवड झाली. सहावी ते बारावीपर्यंत नवोदय विद्यालय येथेच तिचे शिक्षण झाले. बारावीला तिचे सायन्स होते मात्र यूपीएससी परीक्षा पास होणे हे ध्येय असल्याने प्रियंकाने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले, तेथे राज्यशास्त्र या विषयात बी ए करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एम ए केले. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात तिला तयारी नसल्याने यश आले नव्हते मात्र दुसऱ्याच प्रयत्नात तिने पहिल्यांदाच मुलाखतीपर्यंत जाऊन बाजी मारली. प्रियंका ही सेट नेट परीक्षा उत्तीर्ण असून तिला ज्युनिअर रिसर्च फेलोशिप ही मिळालेली आहे.
प्रियंकाची मोठी बहीण एमबीबीएस असून ती तालुक्यातील सावरगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर भाऊ रोशन हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर असून त्याची सुद्धा यूपीएससीची तयारी चालू आहे. वडील गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक असून स्वामी मुक्तानंद विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे.
पोलीस जमादार असलेल्या आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास
प्रियंका मोहिते हिचे मूळ गाव मालेगाव मधील पोहाने हे आहे, पोलीस दलातील नोकरीच्या निमित्ताने तिचे आजोबा सुकदेव मोहिते हे येवल्यात पोलीस दलात नोकरीला होते, वडील सुरेश मोहिते हे सुद्धा येवलेतीलच स्वामी मुक्तानंद विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले ,जमादार असलेल्या सुकदेव मोहिते यांचे आपल्या नातवांनी पोलीस दलातील सर्वोच्च पद असलेले आयपीएस पदाला यूपीएससी द्वारे गवसणी घालावी असे स्वप्न होते, यूपीएससीमध्ये 595 क्रमांकाचा रँक मिळवलेल्या प्रियंकाने आपल्याला आयपीएस मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आजोबा पोलीस जमादार सुकदेव मोहिते हे बुद्ध वासी आहेत.
हेही वाचा –
- Ram Navami Nashik | रामनवमी मिरवणूकीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट
The post येवल्याच्या पोलीस जमादाराची नात वयाच्या 23 वर्षी झाली IPS appeared first on पुढारी.