
येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना ६३ कोटी रुपयांची मदत प्राप्त झाली. येवला तालुक्यातील सुमारे ६३ हजार ८९८ शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप होणार आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येवला तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. या शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार येवला तालुक्यासाठी शेतकऱ्यांना ६३ कोटी रुपयांची मदत महसूल विभागाला प्राप्त झाली आहे. या माध्यमातून येवला तालुक्यातील सुमारे ६३ हजार ८९८ शेतकऱ्यांना मदत त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तलाठी कार्यालयात करावी. त्यातून शेतकऱ्यांना तत्काळ ही मदत त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.
हेही वाचा :
- Sangali New: करगणी यात्रेत पाच कोटींची उलाढाल; १० हजारहून अधिक जनावरांची आवक
- International College of Music: लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन
- International College of Music: लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन
The post येवल्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ६३ कोटींची दुष्काळी मदत appeared first on पुढारी.