राम भरोसे नको आता काम भरोसे मत मागा : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे www.pudhari.news

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; महाराष्ट्रात सध्या मोदींचे दौरे वाढले आहेत. फिरुन घ्या, महाराष्ट्र बघून घ्या. हाच महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार आहे. महाराष्ट्र जेव्हा संकटात होता, महाराष्ट्रातील शेतकरी जेव्हा संकटात होता तेव्हा मोदी कधी महाराष्ट्रात आले नाही. आता मात्र मतांसाठी महाराष्ट्रात येत आहेत. मणिपूरला लोकसभेच्या फक्त 2 जागा आहेत, म्हणून ते तिकडे गेले नाहीत. मात्र निवडणूक आल्यावर त्यांना महाराष्ट्र आठवतो. राम भरोसे बास झालं आता काम भरोसे मत मागा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर (दि. 23) सायकांळी 7 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा झाली.  दार उघड बये दार उघड, असे भवानी मातेला साकडं घालत उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेची सुरुवात केली. आपल्या भाषणातून त्यांनी भारतीय जनता पक्षावर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्र संकटात असताना मोदींनी महाराष्ट्राची मदत केली नाही. याऊलट गुजरातमध्ये तोक्ते वादळ आले तर गुजरातला 1 हजार कोटींची मदत केली. म्हणजे देश के लिए जन और गुजरात के लिऐ धन की बात असेच मोदींचे व्हिझन असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

राक्षसांचा वध करण्याची वेळ …

ज्या गोष्टीसाठी शिवसेनेने संघर्ष केला. तो क्षण टीव्हीवर का होईना पाहिला. त्याचा मला अभिमान आहे. त्यातील काही कारसेवक येथे उपस्थित आहेत. त्यांना मी वंदन करतो. काल नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो. सावरकर जन्मभुमित गेलो. अयोद्धा जन्म भूमी आहे तर नाशिक पराक्रम भूमी आहे. आता जिथे मंदिर आहे. तिथे पर्णकुटी होती. भगवान राम व सीता तिथे राहिले. शृपनखेचे काननाक इथेच कापले. त्यावेळी तब्बल 14 हजार राक्षण रामाला मारायला आले होते. त्यावेळा रामाने अतिभव्य कालस्वरुप रुप धारण करुन त्यांचा वध केला. आता आपल्यालाही राक्षसांचा वध करण्याची वेळ आली आहे.

मंदिराला विरोध नाही, तो तर आमचा…

मंदिराला आमचा विरोध नाही, रामंमदिर तर आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. काल, प्राणप्रतिष्ठेवेळी शिवसेना प्रमुखांची आठवण झाली. त्यावेळी हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे केलं, ते आज शेमड्या वयात असलेल्यांना काय माहिती? ते विचारताय शिवसेनेचे राममंदिर लढ्यात योगदान काय म्हणून, शिवसेना प्रमुखांनी बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली होती, हे विसरु नका. तुमच्या पक्षात आता घोटाळेबाजांना जागा आहे, शंकराचार्यांना नाही. घोटाळेबाज तुम्ही तुमच्या पक्षात घेतल्याची टीका उद्दव यांनी केली.

शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा….

शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगण्याची शिकवून आम्हाला बाळासाहेबांनी दिली. हिंदुत्व व सनातन धर्म नुसत्या बोलणाऱ्या भाजपला हे काय कळणार. रामनवमी पर्यंत थांबला असता तर काय बिघडले असते.  राम मंदिरासाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिला. काश्मीर मधील 370 कलम काढून टाकण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला. जेव्हा जेव्हा हिंदूवर अन्याय होतोय असे लक्षात आले तेव्हा शिवसेना मदतीला धावून आली. आणि आता तुमच्या मदतीला धावून आलेल्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघाला आहात.

केवळ राम भरोसे मत मागताय

भारतीय जनता पक्षाकडे मुळात कार्यकर्तेच नाही. मी आधीही सांगितले आहे. त्यांच्याकडे एकच चेहरा आहे. त्यामुळे ते आता राम भरोसे मत मागत आहेत. दहा वर्षात त्यांनी काही कामच केले नाही.  आताही सांगतो. शिवसेना ही माझी वडिलोपार्जित सपंत्ती आहे. माझ्या वडिलांचा वारसा मी पुढे चालवतो आहे. घराणेशाहीवरुन टीका काहीजण करताय. मुळात ज्यांनी घरदार सोडले त्यांनी अशी टीका करुन नये. अशी टीका करणेे हे फक्त घरणदाज लोकांनाच  शोभेल असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता लगावला. आमच्यावर सीबीआय- इडीच्या धाडी टाकतात. आमची सत्ता येऊ द्या मग तुम्हाला दाखवतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

मोदी महाराष्ट्राला ओरबडत आहेत

मोदींचे राजकारण घाणेरडे आहे.  मोदी हे देशात व गुजरात राज्यात भिंत उभी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत हे इंग्रजांचे म्हणून लुटले. तुम्ही मात्र आमचा महाराष्ट्र लुबाडात आहात. महाराष्ट्राचे वैभव ओरबडून सारे काही गुजरातला घेऊन जात आहात.  अरे मिंध्या तुझ्यासमोर महाराष्ट्राची ही अवस्था होते आहे आणि तू केवळ  आणि तू शेपूट आत मध्ये घालून केवळ बघतो आहेस हेच का तुझे हिंदुत्व अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली. महाराष्ट्र संकटात तुम्हाला दिल्लीत घेऊन गेला. त्या महाराष्ट्राच्या जीवावर उठले असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आता योगींनाही घरी पाठवतील

आमित शहांनी दिलेलं वचन मोडलं, वचन मोडून रामभक्त म्हणवतात. तेव्हा वचन पाळले असते तर  फडणवीस पूर्ण अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले असते. असे वारंवार महाराष्ट्रात येण्याची गरज पडली नसती. ज्यांनी दिशा दाखवली त्यांच्या मुळावर तुम्ही येताय. हे हुकुमशाहीकडे वाटचाल असून भाजप त्यांच्याच पक्षातील प्रतिस्पर्धींना संपवत असल्याची टीका करत भाजप भविष्यात योगींना देखील घरचा रस्ता दाखवतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.

The post राम भरोसे नको आता काम भरोसे मत मागा : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.