राहुल गांधीच्या हस्ते त्र्यंबकेश्वराची पूजा, पाहा व्हिडीओ

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक मध्ये रोड शो व सभा घेतल्यानंतर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही त्र्यंबकेश्वर येथे पोहचली. येथे राहुल गांधी यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यासंबधीचे व्हिडीओ वृत्त ANI ने दिले आहे.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान याआधी राहुल गांधी यांनी देवघर येथे बैद्यनाथ धाम, वाराणसी मध्ये काशी विश्वनाथ आणि उज्जैन येथे महाकालेश्वराचे चे दर्शन घेतले.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असून समारोप 16 मार्चला शिवाजी पार्कवर होणार आहे. याठिकाणी राहुल गांधी यांची जाहीर सभा होईल. नियोजित दौऱ्यानुसार पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे राहुल गांधी मुक्काम करुन पुढे मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे.

The post राहुल गांधीच्या हस्ते त्र्यंबकेश्वराची पूजा, पाहा व्हिडीओ appeared first on पुढारी.