रेल्वे इंजिनच्या धक्क्यामुळे तुटला महिलेचा कान

नाशिकरोड रेल्वेस्टेशन,www.pudhari,news

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा ; येथील नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर धावत्या इंजिनचा महिला प्रवाश्यास धक्का लागला. त्यामुळे महिलेचा कान तुटून महिला जखमी झाल्याची घटना घडली. लोहमार्ग पोलिसांनी समयसूचकता दाखवत महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे महिलेचा जीव वाचला.

कल्पना भागवत चौधरी (54) राहणार जय भवानी रोड नाशिकरोड असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेला मुबंई वरून भुसावळकडे जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनचा जबर धक्का लागला. त्यात महिलेचा कान तुटून पडला तर डोक्याला गंभीर इजा झाली आहे. यासंदर्भात लोहामर्ग पोलीस भागवान बोडके यांना समजले त्यानंतर विलंब न करता जखमी महिलेला अनिलकाका नागपुरे व इरफान शेख यांच्या मदतीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी स्थानकावर असलेले गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संतोष उफाडे पाटील, रघुनाथ सानप, रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचारी शोभा मोटे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी तुटून पडलेले जखमी महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफूल हे तिचे पती भगवान थोरात यांच्या ताब्यात दिले. पत्नीचा जीव वाचवल्या बद्दल पतीने भावविवेश होत लोहमार्ग पोलिसांचे ऋण व्यक्त केले. प्रभारी पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी कर्मचारी यांचे कौतुक केले.

हेही वाचा :

The post रेल्वे इंजिनच्या धक्क्यामुळे तुटला महिलेचा कान appeared first on पुढारी.