वणी: लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, वणी येथील हायस्कूलमधील मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागल्या असताना कर्मचारी मतदान थांबवून सर्वजण एकत्र जेवायला बसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मतदारांना २० मिनिटे रांगेत तिष्ठत बसावे लागले.
वणी येथील हायस्कूलमध्ये दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १०५, १०६, १०७, १११, ११२ अशी मतदान केंद्र आहेत. दरम्यान, दुपारी एकच्या दरम्यान मतदान केंद्र १०७ मध्ये मतदानासाठी मतदारांची मोठी रांग लागलेली होती. तर दुसरीकडे केंद्रातील कर्मचारी मतदान प्रक्रिया थांबवून सर्व जण एकत्र जेवायला बसले होते.
त्यामुळे मतदारांना २० मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी फोटो काढले असता तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. एक महिला कर्मचारी खुर्चीवर बसलेल्या होत्या. परंतु, त्या एकट्या मतदान प्रक्रिया राबवू शकत नसल्याने त्याही इतर कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसल्या होत्या.
हेही वाचा