वसंत मोरेंनी फक्त वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये : संजय राऊत यांचा सल्ला

संजय राऊत वसंत मोरे (1)

पुढारी ऑनलाइन डेस्क ; पुण्यातील मनसे नेते व नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मनसेच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे प्रमुख शिलेदार होते, त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर मी काय बोलू…, वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षाला रामराम का ठोकला, त्यांची पुढील दिशा काय आहे. ते लोकसभा लढविणार असतील तर कोणाकडून लढवणार आहे हे त्यांनी ठरवावं. फक्त त्यांनी भाजपच्या वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये, कारण ते स्वत:च स्वच्छ असल्याचा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. वसंत मोरे चांगला कार्यकर्ता आहे, मी त्यांना ओळखतो.

वसंत मोरे हे शरद पवार यांना भेटले होते, अशी चर्चा होती. त्यावर बोलताना राऊत म्हणाले त्यांनी पवार साहेंबांची भेट घेतली असेल तर त्यात वावगे काही नाही, पवार साहेब देशाचे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत.

संजय राऊत हे नाशिकमध्ये आले आहेत. उद्या राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये दाखल होणार आहे, त्यासाठीच संजय राऊत नाशिकमध्ये आले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा फायदा महाराष्ट्राला होईलच त्याशिवाय तो महाविकास आघाडीलाही होईल असे राऊत म्हणाले.

वंचितला 4 जागांचा प्रस्ताव

दरम्यान जागावाटपावर संजय राऊत खोटे बोलत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती, त्यावर बोलताना जागावाटप प्रत्यक्ष भेटून होते. समाजमाध्यमांवर अशा गोष्टी ठरवल्या जात नाही. वंचित बहुजन आघाडीला 4 जांगाचा प्रस्ताव आम्ही दिला आहे, त्यांनी आम्हाला एक यादी दिली होती, त्यातील उत्तम चार जागा आम्ही त्यांना  दिल्या.  जागा उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात बैठकीला होते. मी खोटे का बोलू… प्रकाश आंबेडकर आमचे मित्र आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. आम्ही स्वत :बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत, संविधान वाचविण्यासाठी मैदानात उतरलेले लोक आहोत. आम्हाला प्रकाश आंबेडकरांची साथ हवी आहे.

The post वसंत मोरेंनी फक्त वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये : संजय राऊत यांचा सल्ला appeared first on पुढारी.