वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल

खासदार संजय राऊत

 नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा दादा भुसे यांच्याविरोधात पुरावे सादर करावेत, अशा स्पष्ट शब्दांत मालेगाव न्यायालयाने खडेबोल सुनावले आहेत. मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांवर दाखल केलेल्या अब्रूनुकसानी खटल्याच्या मालेगाव न्यायालयातील सुनावणीस संजय राऊत गैरहजर होते.

मालेगाव न्यायालयात शनिवारी (दि. 3) संजय राऊत गैरहजर राहिल्याने त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली. संजय राऊत गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने वकिलांमार्फत राऊतांना सुनावले आहे. राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावे, असे थेट बजावले. यावेळी मंत्री भुसे यांनी न्यायालयात हजर राहून साक्ष नोंदविली. भुसे यांची साक्ष नोंदविल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीला निश्चित केली आहे.

The post वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल appeared first on पुढारी.