नाशिक ऑनलाइन डेस्क : पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव मंगळवारी (दि. 23) साजरा होत असून, यानिमित्त शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आला आहे. मूर्तीची रंगरंगोटी तसेच तयारीमध्ये भाविक व्यग्र झाल्याचे चित्र आहे. पहा फोटो… (सर्व छायाचित्रे : रुद्र फोटो)
चैत्र पौर्णिमेला रामनवमीनंतर सहा दिवसांनी दरवर्षी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. तर प्रभु श्री राम जन्मानंतर सहा दिवसांनी हनुमानाचा जन्म झाला होता. यावर्षी हनुमान जयंती दि. २३ एप्रिल २०२४ रोजी मंगळवारी येत आहे. मंगळवार हा हनुमानाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी साजरी होणारी हनुमान जयंती अत्यंत शुभ मानली जाते.
हनुमान जयंती हा हनुमान भक्तांसाठी तसेच राम भक्तांसाठी विशेष दिवस आहे. कारण हनुमान हे स्वतः प्रभु श्री रामांचे परम आणि प्रिय भक्त होते. या शुभ दिवशी भक्त बजरंगबलीची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. दरवर्षी चैत्र शुक्ल नवमी तिथीला रामनवमीनंतर सहा दिवसांनी हनुमान जयंती साजरी केली जाते. यावर्षी १७ एप्रिल रोजी सर्वत्र रामनवमी साजरी करण्यात आली
प्रभु श्री रामाचा जन्म त्रेतायुगात तर श्री हरी विष्णूचा सातवा अवतार म्हणून पृथ्वीवर झाला. तर हनुमान हे भगवान शंकराचा ११ वा रुद्रावतार म्हटले जाते. तर प्रभु श्रीरामांना मदत करण्यासाठी स्वतः हनुमानजी यांनी जन्म घेतला असल्याचे सांगितले जाते.