इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे निवडणूक यंत्रणा सतर्क

ईवीएम स्ट्रांग रूम pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
पुणे शहरात घडलेल्या इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे राज्यभरातील निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे. मालेगाव शहरात जुन्या तहसील इमारतीत असलेल्या स्ट्राँगरूम (EVM Strongroom) परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवून पाच सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येथे ठेवण्यात आलेल्या डेमो इव्हीएम मशीनचा दररोज आढावा घेतला जात आहे.

देशभरात इव्हीएम मशीनला विरोध होत आहे. आगामी लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, निवडणुका इव्हीएम मशीनवरच होणार असल्याचे निश्चित झाल्याने ठिकठिकाणी याविरोधात आंदोलने केली जात आहेत. अशातच पुणे शहरातील सासवड परिसरात स्ट्राँगरूममधून दोघा चोरट्यांनी डेमोचे इव्हीएम मशीन चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे राज्यभरातील स्ट्राँगरूमची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मालेगाव शहरात जुन्या तहसील इमारतीत असलेल्या स्ट्राँगरूमला सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रशिक्षणासाठी मिळालेले ३३ इव्हीएम मशीन या स्ट्राँगरूमध्ये ठेवले आहेत. मशीनच्या सुरक्षेसाठी दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा २४ तास खडा पहारा तैनात केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ, तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी नुकतीच स्ट्राँगरूमची पाहणी केली. (EVM Strongroom)

हेही वाचा:

The post इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे निवडणूक यंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.