वेटर व्हिडिओ काढत असल्याचे लक्षात येताच तिचा आरडाओरडा

वणी (नाशिक) : पुुढारी वृत्तसेवा – वणी-कळवण रस्त्यावरील हॉटेलमधील स्वच्छतागृहात गेलेल्या युवतीचा व्हिडिओ काढणाऱ्या वेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, वणी-कळवण रस्त्यावरील हॉटेलमधे कुटुंब जेवणासाठी आले होते. जेवणानंतर युवती स्वच्छतागृहात गेली असता, मागील बाजूकडून जात फटीतून वेटर तिचा व्हिडिओ काढत होता. हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला मात्र वेटर तेथून निघून गेला. तिने बाहेर येऊन हॉटेलच्या व्यवस्थापकाला सर्व हकिकत सांगितली. प्रारंभी तो मी नव्हेच, असा पवित्रा त्या वेटरने घेतला. मात्र सीसीटीव्ही फुटेजमधे दुष्कृत्य करणारा वेटर दिसून आला. युवतीच्या कुटुंबीयांनी हा प्रकार पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी येत जबाब नोंदविले. युवतीच्या तक्रारीवरून किशोर धुळे (२१) विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

हेही वाचा: